Share

मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे आज सकाळी 11 वाजता दिल्लीतील पंतप्रधान यांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.या भेटीत मुख्यतः मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल. माजी न्यायाधीश दिलीप भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झाल्यानंतर राज्य सरकार कायदेशीर बाबीच्या तयारीला लागले आहे. मात्र, 102व्या घटना दुरुस्तीनंतर 50 टक्क्यांच्यावर आरक्षण राज्य सरकारला देण्याचे अधिकार राहिले नाहीत, असे याआधीच मुख्यमंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमिती यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आता या मुद्द्याकडे लक्ष द्यावे आणि हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ठाकरे प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!