Share

चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे

Published On: 

नाशिक : चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खऱ्या पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले तर का नाही केले? याचंही उत्तर द्यावं लागतं,’ असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीतील 118 व्या दीक्षांत सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस उप निरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले कि ‘या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून तुम्ही सुदृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात,’ अस उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पोलिसांच्या कामाचे त्यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केले. ‘पोलीस आज एका बाजूला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजूला करोनाचा मुकाबला करत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. पण करोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधात हे शस्त्र चालत नाही. तरीही आपल्या पोलिसांनी या लढाईचं आव्हान स्वीकारलं आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते करोना काळातही कर्तव्य बजावत आहेत,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवीन पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुकही केले आहे. ते म्हणाले कि ‘प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिक्षणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल.’ अशा शब्दात त्यांनी कुतुक केले.

यावेळी त्यांनी नवीन अधिकार्यांन सल्ला दिला कि, ‘खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल. प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!