मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय. पवार यांनी मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी रात्री उशिरा त्यांच्यावर ऑपरेशन केले.
पवार यांना आज रुग्णालयात दाखल करुन त्यांची एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी रात्रीच पवार यांच्या पोटात जाणवू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
शरद पवार यांना 29 मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. यानंतर, डॉक्टरांनी 31 मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा प्रचार करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 1 एप्रिलपासून पश्चिम बंगालला जाणार होते. 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान पवारांचा हा प्रचारदौरा होता. मात्र, रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेश दौर्यादरम्यानच्या मंदिर भेटीवरून तृणमूलकडून मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
- चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो – उद्धव ठाकरे
- ‘या’ तारखेला विराट आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल होणार
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- ‘बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदींना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा


