पुणे : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४व्या सत्राला प्रारंभ होत आहे. भारताने नुकतीच इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली. या मालिका विजयानंतर बहुतेक खेळाडू पुण्यातून थेट त्यांच्या आयपीएलमधील संघाला जाऊन मिळाले आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र अजुनही आरसीबीच्या कॅम्पमध्ये गेला नाही. तो आरसीबीच्या कॅम्पमध्ये येत्या १ एप्रिल रोजी दाखल होणार आहे.
आयपीएल अगोदर तीन दिवस कोहली त्याच्या घरी आराम करणार आहे. आरसीबीचा पहिला सामना हा चेन्नई येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरलेले नाही. मात्र नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय या तिनही मालिकेत कर्णधार कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजय मिळवला आहे. शेवटच्या सामन्यानंतर अनेक खेळाडू थेट पुण्यवरुन आपआपल्या संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.
आरसीबीचे सराव शिबीर हे ३० मार्च रोजी सुरु झाले आहे. पुर्वतयारी म्हणून या सराव शिबीराकडे लक्ष दिले जाते. सुरुवातीच्या सामन्यातील संघाची रणणिती, बलस्थाने यावर विचार केला जातो. आरसीबीच्या कॅम्पमध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दाखल झाले आहेत. तसेच नवदीप सैनी सह येथे माइक हेसन आणि प्रशिक्षक संजय बांगर हेही कॅम्पमध्ये सामील झाले आहेत. यंदाच्या सत्रातील सलामिचा सामना हे मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघात ९ एप्रिल रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेची तब्येत पुन्हा बिघडल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ
- नांदेड जिल्ह्यात संचारबंदीतही ३५ हजारांची दारु जप्त
- कोरोनाच्या नावाखाली सरकार वेडेपणा करत असेल तर अशा घटना घडणारच; कॉंग्रेस नेत्याने दिला घरचा आहेर
- तृणमूल खासदार प्रचाराला वैतागल्या ? भाजपकडून तृणमूल काँग्रेस ट्रोल
- महसूल विभागाच्या आशीर्वादाने संचारबंदीतही वाळूचा अवैध उपसा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

