Share

धक्कादायक! एवढ्या संकटात केवळ तंत्रज्ञ नसल्याने परभणीत व्हेंटिलेटर धुळखात पडून

Published On: 

परभणी : कोरोन रुग्णांचा वाढता कहर तसेच कोराेना रुग्णांचे मृत्युचे प्रमाण अश्या संकटाच्या काळामध्ये देखील जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्हा परिषद नूतन इमारतीतील व्हेटिलेटर तंत्रज्ञ नसल्यामुळे अभावी धुळखात पडले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी परभणी जिल्ह्यासाठी ७० व्हेटिलेटर्स बेंगलोर येथून पाठवले होते. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी व्हेटिलेटर मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतू जिल्हा रुग्णालय हे व्हेटिलेटर दाखल झाल्यानंतर ते अद्यापपर्यंत शंभर टक्के वापरात आले नसल्याची भयावह परिस्थिती एक वर्षांनंतर देखील पहावयास मिळत आहे. परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतील कोविड सेंटरमधून हे व्हेटिलेटर उपलब्ध झालेले आहेत.

परंतू व्हेंटीलेटर्स  वापरता येणारे तंत्रज्ञ नाहीत. त्यामुळे हे व्हेंटीलेटर्स  चक्क धुळ खात पडलेले दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमध्ये आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासल्यास ते लगेच उपलब्ध होईल, या गोष्टीची माहिती राहिली नाही. कारण तंत्रज्ञ वर्गच नाही. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने कंत्राटी पद्धतीने तंत्रज्ञ नियुक्त करण्यासंदर्भात हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे अशी स्थिती  उद्भवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!