🕒 1 min read
मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यामध्ये गेल्या एक महिन्याहून अधिक कालावधीत लॉकडाऊन सुरू असून हातावर पोट असणाऱ्यांचे रोजचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. त्यांना इतर कुठल्याही मार्गाने उत्पन्न नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालाविली आहे. वैद्यकीय उपचार करण्याकरिता त्यांना कुठल्याही प्रकारचे मदत किंवा आर्थिक स्त्रोत नाही. अशी सर्व भीषण परीस्थिती आपण समाजाच्या अनेक घटकांची पाहत आहोत.
या कोरोना महामारीमुळे मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर देखील भल मोठ संकट उभ राहिल्यचे आपल्याला दिसत आहे. त्यांना सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे राज्यात कुठल्याही प्रकारच्या चित्रिकरणावर निर्बंध लादण्यात आले असल्याच्ने त्यांनी याबाबत नाराजी राज ठाकरे यांच्य्कडे व्यक्त केली होती. या नंतर राज ठाकरे यांनी लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे, असं मत राज यांनी मांडलं. त्यानंतर मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिल्यास त्यांना मंजुरी देता येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
परंतु हा नेमका बायो बबल कसा असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची संख्या किती असेल, सरकारने आखून दिलेल्या नियमांची कशी अंमलबजावणी होणार, चित्रीकरणाची जागा कोणती असेल, कलाकार-तंत्रज्ञ यांची राहण्याची व्यवस्था काय असेल अशा सर्व बाबी नमूद असलेला प्रस्ताव जर प्रत्येक निर्मात्याने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे सादर केला तर त्यापुढील मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येईल, असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान काल राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीमध्ये मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज ५० कलाकार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, मनसे नेते अमित ठाकरे, दिग्दर्शक सतीश राजवाडे , महेश कोठारे, महेश मांजरेकर, प्रशांत दामले,केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- जीएसटी अनुदान देण्यात शासनाकडून विलंब, पालिका कर्मचाऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा!
- तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – अजित पवार
- चिंताजनक ! अहमदाबादमध्ये १३ वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण
- मान्सून आला रे…! हवामान खात्याच्या अंदाज तंतोतंत खरा
- अतुल भातखळकरांना लाज वाटली पाहिजे; हसन मुश्रीफांनी झापलं !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
