🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटुचे अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र अवघ्या एका तासात क्रिकेटपटूची सुटकाही करण्यात आली. मात्र यादरम्यान बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आले. साधारण १५ दिवसापुर्वी ही घटना घडली होती.
१४ एप्रिल रोजी सिडनी शहरात ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट मॅकगिल यांच्या घरात घुसून अपहरण करण्यात आले होते. यावेळी त्यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली आणि धमकावण्यात आले होते. तर पुढील एका तासात त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी ५ मे रोजी सिडनी पोलिसांनी ४ व्यक्तिंना अटक करण्यात आली आहे.
२० एप्रिल रोजी मॅकगिल यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांच्या तपासाला यश आले असुन ५ मे रोजी त्यांनी ४ व्यक्तींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना स्थानिक पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. आरोपीचे वय हे २७, २९, ४२ आणि ४६ असुन लवकरच त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या मुलाचे धुमधडाक्यात लग्न, गुन्हा दाखल
- बंगाल हत्याकांड! हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणाऱ्यांना लोकशाहीवर बाता मारण्याचा काहीही अधिकार नाही – प्रवीण दरेकर
- ‘मराठा समाजाला आरक्षण द्याच !’ मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान, राष्ट्रपतींना हात जोडून विनंती !
- देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
- ‘दृश्यम-2’ सिनेमा येण्यापूर्वीच अडकला वादाच्या भोवऱ्यात; निर्मात्याविरोधात खटला दाखल

