Share

देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण कायद्याच्या विरोधात; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई   – भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आरक्षण कायद्याच्या विरोधात आहेत. तसेच  मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी दोन्ही बाजुने भाजप  खेळतेय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होऊ लागल्याने आता महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षालाच यासाठी जबाबदार ठरवले आहे.  मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त पत्रकार परिषद झाली.यावेळी बोलताना मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत.

राज्यसरकारची मराठा आरक्षण मिळायला हवे या भूमिकेत आहे. मात्र भाजपचे देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. आपल्या पैशाने कोर्टात वकील पाठवत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही माजी पोलीस आयुक्तांना दिलेला वकील भाजपशी संबंधित आहे. न्यायालयीन लढाईसाठी देवेंद्र फडणवीस यांची फूस होती असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते. आज जे वकील कोर्टात लढत आहेत त्याला पाठबळ भाजपचे आहे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे कामही भाजप करत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!