🕒 1 min read
मुंबई : अभिनेता अजय देवगण याचा ‘दृश्यम-2’ या सिनेमाचे २०२१ वर्षाच्या शेवटी शूटिंग सुरु होणार असून २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हा चित्रपट येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘दृश्यम’ च्या हिंदी रिमेकला प्रोड्यूस करणारी कंपनी वायकॉम १८ मोशन पिक्चरने निर्माते कुमार मंगत यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार ‘दृश्यम सिनेमाची निर्मिती वायकॉम 18, पॅनोरमा स्टूडियो आणि कुमार मंगत यांनी केली होती. त्यामुळे ‘दृश्यम-2’ सिनेमाचे हक्क निर्मात्याने फक्त पॅनोरम स्टूडिओला कसे दिले?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. वायकॉम 18 कंपनीने निर्माते कुमार मंगत यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. वायकॉम १८ ने कुमार मंगत यांना ते इतर कुणासोबत सिनेमा करू शकत नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कुमार मंगत यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला असून लवकरच त्यावर सुनावणी सुरू होणार आहे.
मल्याळी सिनेमाचा रिमेक असलेला ‘दृश्यम’ सिनेमा २०१५ साली रिलीज झाला. कुमार मंगत, अभिषेक पाठक यांची प्रोडक्शन कंपनी पॅनोरम स्टुडिओ इंटरनॅशनल आणि वायकॉम १८ ने एकत्रीत केली होती. मात्र नुकतच निर्माते कुमार मंगत यांनी पॅनोरमा स्टुडिओने ‘दृश्यम-2’ सिनेमाचे राईटस् विकत घेतल्याची घोषणा केल्यानंतर हा वाद निर्माण झाला आणि वायकॉम १८ कंपनीने खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात सोशल डिस्टंसिंगचे वाजले तीनतेरा
- दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; ७०४ रुग्ण बरे होऊन गेले घरी
- ‘भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील मराठा समाजानं गरीब मराठा समाजावर अन्याय केलाय’
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद

