Share

बंगाल हत्याकांड! हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणाऱ्यांना लोकशाहीवर बाता मारण्याचा काहीही अधिकार नाही – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

बीड: बंगाल मध्ये झालेल्या हत्याकांडामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसेमुळे भाजप पक्षातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला. काही दिवसांत राज्यात विविध ११ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आंदोलन केले आहे.

शहरात भाजप कार्यालयासमोर दरेकर व इतर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. लोकशाहीची हत्या करण्याचं काम सध्या बंगालमध्ये सुरु आहे, याचा जोरदार निषेध देशभरात होत असल्याचं दिसत आहे. बंगालमध्ये घडत असलेल्या हत्याकांडावर हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणाऱ्यांना लोकशाहीवर बाता मारण्याचा काहीही अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

बंगाल विजयानंतर ममता यांच्या कौतुकाचे पोवाडे गाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासर्व घटनांवर मौन बाळगले आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाऱ्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांने त्यावर मत व्यक्त केलेले नाही. मात्र बंगालमध्ये झालेल्या या हिंसाचाराचे नक्कीच तीव्र पडसाद देशभरात आता बघायला मिळणार आहेत. यावर पुढे काय होतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!