🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. त्यात लग्न समारंभासाठी २५ पेक्षा कमी लोकात लग्न समारंभ करण्यासाठी मुभा असताना. सत्ताधारी पक्षातील माजी आमदाराला मुलाच्या लग्नात या नियमावलीचा विसर पडल्यामुळे समारंभात गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला. त्यामुळे चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाचा विवाह गणेश भारत चौधरी यांच्या मुलीशी ठरला. सुरवातीला हा विवाह २८ एप्रिलला ठरले होते. परंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यांनी तारीख पुढे ढकलली. त्यानंतर विवाहाची तारीख ४ मे ठरविण्यात आली. त्यानुसार मंगळवारी चितेपिंपळगाव येथील बागडे लॉन्सवर विवाह संपन्न झाला.
माजी आमदाराच्या मुलाच्या लग्नाला वऱ्हाडी देखील मोठ्या संख्येने जमले. राज्य शासनाने दि. ३० एप्रिल रोजी काढलेल्या नियमावलीत विवाह सोहळ्यावर कडक निर्बंध लावले. २५ पेक्षा जास्त लोकांना सोहळ्यास उपस्थित राहता येणार नसल्याचे नमूद असताना. सत्ताधरी माजी आमदार यांनी लग्न सोहळा धुमधडाक्यात केला. हि माहिती ग्रामपंचायत कोविड १९ समिती सदस्य पांडुरंग सर्जेराव सोनवणे यांना समजली.
त्यांनी तत्काळ चिकलठाणा पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. या वरून पोलिसांनी माजी आमदार संजय वाघचौरे यांचे व्याही तथा आयोजक गणेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच बागडे लॉन्सचे मालक प्रल्हाद कडूबा बागडे यांना चिते पिंपळगाव ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये दंडाची नोटीस देखील पाठवली.
महत्वाच्या बातम्या
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
- कोरोनामुळे महिला आयपीएल स्पर्धाही स्थगित; मात्र ‘या’ स्पर्धेत खेळण्याची मिळाली संमती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
