Share

“पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेणार नाही…”, व्हिडीओ शूट करत युवा शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: 

पंढरपूर : पंढरपुरात एका शेतकरी मुलाने व्हिडिओ शूट करून आत्महत्या केली आहे. व्हिडिओ शूट करून विष प्राशन करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. वीज तोडणी, ज्यादा वीज बिल आकारणी या गोष्टींना कंटाळून आत्महत्या केली आहे, हे धक्कादायक कारण समोर आले आहे.

हा तरुण शेतकरी सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील होता. याचे नाव सुरज जाधव असे आहे. सुरजने २ मार्च रोजी शेतामध्ये विषारी औषध घेतले, त्यानंतर याला पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु होते अखेर आज शुक्रवारी रोजी सुरजने श्वास घेतला.

सुरजने शूट केलेल्या व्हिडिओ मध्ये ‘सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार नाही, शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही’ असे म्हणत सरकारला दोष देत स्वताचा जीव संपवला. या घटनेवर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ‘अतिशय विदारक आणि दुर्दैवी’ घटना आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील या हेतुने मी कोल्हापुरात आंदोलनाला बसलो आहे तरीही या राजकारन्यांना राज येत नाही. असं कोणतही पाऊल उचलू नका अशी विनंती केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!