🕒 1 min read
मुंबई:- अगदी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस बजावलेली आहे. दरम्यान ईडीकडे हजेरी लावण्याअगोदरच एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणं पसंत केलं होते. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याने त्यांच्या समर्थकांना एकच धक्का बसला आहे.
जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रयाण केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केली होती. अखेर आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
एक महिन्यांपूर्वी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना कोरोना झाला असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, घटनेला खडसे परिवाराकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. तसे त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोरोनाच्या सदृश लक्षणे आढळून आल्याने खडसे यांनी ईडी चौकशीसाठी जाण टाळले होते. त्यांनी दिवसांची मुदत मागितली होती.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- रेल्वे मंत्री पीयूष गोयल करणार रेल्वेची ‘नवी वेबसाइट’ लॉन्च
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
