बंगाल : अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी उद्योगपती निखील जैनसोबत १९ जून २०१९ रोजी लग्न केले होते. नुसरत आणि निखील यांचे लग्न हिंदू, इस्लाम प्रथा परंपरेनुसार झालं होतं. निखील जैन दुसर्या धर्मातील असल्याने लग्नानंतर त्यांचीवर टीका करण्यात आली होती. पण याला नुसरत जहाँनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा नुसरत जहाँ एका कारणामुळं चर्चेत आल्या आहे. नुसरत जहाँ ही ६ महिन्याची गर्भवती आहे आणि तिचा नवरा निखील जैन याला ती गर्भवती असल्याची माहिती नसल्याने अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले .
निखील जैन आणि नुसरत जहाँ यांचे लग्न मोडण्याच्या स्थितीत आहे. गेल्या ६ महिन्यापासून निखील नुसरतसोबत राहत नाही यात नुसरत जहाँ जर गरोदर असेल तर ते मुलं माझं नाही असं निखीलनं म्हटलं आहे. इतकचं नाही तर अनेक महिन्यांपासून आमच्या दोघांचा काहीही संपर्क नाही असंही निखीलने सांगितले आहे.
मागील काही दिवसांपासून नुसरत जहाँ ही बंगाली अभिनेता आणि भाजपा नेता यश दासगुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं आहे. त्याचसोबत न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी दोघंही राजस्थानला गेले होते. मात्र या चर्चांवर नुसरत, निखिल आणि यश दासगुप्ता यांच्याकडून कोणतंही अधिकृत माहिती समोर आली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’
- मोदी सरकार म्हणजे हातावर पोट असणाऱ्या गरिबांची काळजी वाहणारे सरकार – रामदास आठवले
- विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’
- आम्ही अडचणीत, आम्हाला मदत करा; छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन आणि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

