Share

विषय हार्ड : निलेश लंकेच्या कोविड सेंटरमध्ये चक्क ‘शुभमंगल सावधान!’

Published On: 

पारनेर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्यांच्या उपक्रमाची राज्यासह देशात चर्चा होत आहे. अनेकांनी त्यांचे कौतूक केले आहे. तर काहींनी विविध शंका उपस्थित केल्या. यावरून बराच वाद देखील रंगला. आता तर चक्क दोन जोडप्यांनी या कोविड सेंटरमध्ये लग्न केलं आणि लग्नाचा खर्च टाळून या कोविड सेंटरला मदत केली आहे. यामुळे आता या अनोख्या विवाहांची चर्चा होणार नाही असं शक्यच नाही !

निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये एकूण अकराशे बेड असून शंभर ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. भाळवणी (ता. पारनेर) येथील या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके स्वतः रुग्णांची सेवा करत असून त्यांच्या या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे. जगभरातील विविध देशांमधून या कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ सुरु आहे.

दरम्यान, कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे लग्न समारंभात होणाऱ्या खर्चाने अधिक भार न वाढवता साधेपणाने लग्न करून अनेक जोडपी आदर्श पायंडा निर्माण करत आहेत. आता तर अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे तसेच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपला विवाह कोविड सेंटरममध्ये केला आहे. सामाजिक भान राखून या जोडप्यांनी या कोविड सेंटरला ३७ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. इतकंच नाही तर रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, अत्यावश्यक औषधे देखील दिले. तर वऱ्हाडी म्हणून रुग्णांना भोजन देखील दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!