औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या दोघांच्याही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले असून मंगळवारी एकाच दिवशी ३२५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ५० हजार ९१६ वर जाऊन पोहोचला आहे. आज (दि.३) शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेकडून व्यापक उपाययोजनाही सुरू आहेत. १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण हाती घेण्यात आले. आता १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजारांनी ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले आहेत. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
१५ दिवसांनी अॅन्टीबॉडीज तयार होतात, नियम पाळावेच लागतील
औरंगाबाद शहरात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या दोघांचेही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. मात्र, शंका आल्याने त्या दोघांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यात त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळून आलीत. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनी अॅन्टीबॉडीज तयार होतात. त्यामुळे लस घेतल्यावरही मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.
– डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंनी केली मागणी, आदिती तटकरेंकडून तत्काळ पूर्तता
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- तर औरंगाबादमधील ‘हा’ भाग होणार लॉकडाऊन
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
