Share

धक्कादायक : औरंगाबादेतही कोरोना लसींचा काळाबाजार उघड, पोलिसांची कारवाई

Published On: 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध भागात होत होत्या. त्यात औरंगाबाद शहरातही लसींचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहराजवळच असलेल्या साजापूर परिसरात अशा बनावटी लसीकरण केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोग्य कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सरकारच्या वतीने मोफत देण्यात येणाऱ्या लसीसाठी या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीकडून ३०० रुपये जमा करण्यात येत होते.

शहर आणि ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रावर लसींचा तुटवडा असल्याने नागरिकांना लसीसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाही दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसांचा कालावधी देण्यात आलेला असला तरी अनेकांना १०० दिवसांनंतरही कोरोनाचा दुसरा डोस मिळालेला नाही. त्यात तासंतास रांगेत थांबावे लागत असल्यानेही नागरिक त्रस्त आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर एका खासगी रुममध्ये अवैधरित्या पैसे घेवून लसीकरण सुरू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारुन एक कर्मचारी आणि लसींचा साठा जप्त केला आहे. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!