औरंगाबाद – वाराणसी येथून शहरात आलेल्या 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना 8 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता रेल्वेस्टेशनवर घडली. माझ्यावर अतिप्रसंग केला, असे पीडितेचे म्हणणे आहे. पोलिसांनी तत्काळ तिची वैद्यकीय तपासणी केली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानात लग्न लावण्यात आले. अनामिका (नाव बदलले आहे) ही 3 जानेवारी रोजी वाराणसी येथून मित्र किंवा नातेवाइकांसोबत शहरात आली होती. ते तिला 6 जानेवारीला शहरात सोडून निघून गेले. त्यानंतर 7 जानेवारी रोजी रात्री ती मुलगी बसस्थानकावरून पायी निघाली. मध्यरात्री बाराच्या सुमारास रेल्वेस्टेशनवर पोहोचली. पहाटे तीन ते पाचच्या सुमारास ही लघुशंकेसाठी प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूला पार्किंगजवळ गेली. तेथे तिघांनी अतिप्रसंग केल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर ती पायीच चिकलठाणा रेल्वेस्टेशनपर्यंत चालत गेली. दरम्यान, 8 जानेवारी रोजी संध्याकाळी चिकलठाणा रेल्वेस्टेशनच्या बाहेर ती रडत असताना काही तरुणांनी पाहिले आणि स्टेशन मास्तरांना सांगितले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत तिची चौकशी केली. त्यानंतर तिने पोलिसांना आपल्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले.
पीडितेच्या तक्रारीत अस्पष्टता
‘माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर मी रेल्वेमार्गाने चिकलठाणा येथे आले’ असे अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तिनेच ‘माझ्यावर दुपारी अत्याचार झाला असे सांगितले. पुन्हा तिने एकानेच अत्याचार केला’ अशा तीन वेगवेगळ्या बाबी पोलिसांना तिने सांगितल्या. यामुळे सुरुवातीला पोलिस चक्रावले. पण त्यांनी या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी करीत संशयितांचा शोध सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारमध्ये कधीही नवा घोटाळा बाहेर येईल,कॉंग्रेस नेत्याचे सोनिया गांधींना पत्र
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- सिडनी आणि वाद हा जुनाच; 2008 मध्येही घडले होते ‘असे’ काही…
- औरंगाबादसाठी ‘या’ मॉडेलने नाकारली ‘तुझ्यात जीव रंगला’तील भुमिका
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
