Share

धक्कादायक : जिल्हाधिकारी उद्धटासारखे वागले म्हणून ८९ डॉक्टरांनी दिलेत राजीनामे   

Published On: 

यवतमाळ : कोरोनाच्या लढ्यात मूलभूत सोयी पुरविणारा प्रत्येकजण जीवाची पर्वा न करता लढतो आहे. यात डॉक्टरांचे सर्वत्र मोलाचे योगदान लाभले आहे. यवतमाळमध्ये एका वैद्यकिय अधिकाऱ्याच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टर्स व त्यांच्या कुटुंबियांसाठी रुग्णालयांत काही बेड आरक्षित असावे अशी मागणी होत आहे.

पण जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना भेटण्यास गेलेल्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप होतो आहे. त्यामुळे एकाच दिवशी ८९ डॉक्टरांनी राजीनामे दिल्याची घटना यवतमाळमध्ये घडली असून, जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे. विशेष म्हणजे तोपर्यंत काम करणार नसल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. फेब्रुवारीपासून सर्व डॉक्‍टर मार्गदर्शक सूचनांनुसार काम करीत आहेत. सात महिन्यांत जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांची कुठेही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नाही, असा ‘मॅग्मो’चा आरोप आहे. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा धाक दाखविला जातो. त्यामुळे मनोबल खचत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. आरोग्य अधिकारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता काम करीत आहेत.

कोविडविषयक अहवाल गाव पातळीवरून तालुका व जिल्हास्तरावर पाठविण्यात येतात. कार्यालयीन काम संपल्यावर अहवाल तयार करणे शक्‍य होत नाही. इतर विभागाचे सहकार्य मिळत नाही. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ‘मॅग्मो’चे काहीही ऐकून घेतले नाही. आम्हाला कुटुंब नाही का, असा प्रश्‍न उपस्थित करीत तब्बल ८९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, डॉ. रवींद्र दुर्गे, डॉ. संघर्ष राठोड, डॉ. महेश मनवर, डॉ. आशीष पवार, डॉ. अर्चना देठे, डॉ.अमित कारमोरे, डॉ. सुभाष ढोले आदींसह तालुका वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!