परभणी : देशासह राज्यात कोरोनापाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याने आता अधिक चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू होत असल्याने राज्य सरकारने त्या संदर्भातील उपाययोजना सुरु केल्या आहेत.
परभणीत 3 दिवसांपूर्वी मुरुंबा तालुक्यातील 800 कोंबड्याचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. यामुळे राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.
परभणीतील घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या सुचना केल्या आहे. 10 किलोमीटरच्या परिसरात सर्व प्रकारच्या पक्ष्यांची ने-आण, खरेदी-विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तत्काळ पशुसंवर्धन विभागाला कळवण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्वाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे बर्ड फ्लू बद्दल कोणता निर्णय घेतील हे पहाणे महत्वाचे ठरणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे’
- मराठा नेते दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत – प्रकाश शेंडगे
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- माझी सुरक्षा कमी करा; शरद पवारांचा अनिल देशमुखांना फोन!
- आता अजित पवार यांच्या पत्नीलाही मिळणार सुरक्षा !


