मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिचा लॉकअप शो सध्या सुपरहिट ठरतोय. लॉकअप शो हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचं एकता म्हणाली आहे. या कार्यक्रमातील गोष्टींबाबत सर्वत्र बोललं जातं. ओटीटीवरच्या या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय. यातली कंगनाची अँकरिंगची स्टाईल, अतरंगी स्पर्धकांचा अतरंगी अंदाज अनेकांना आवडतोय. या रिअॅलिटी शोने आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले असल्याचं लॉकअप शोची निर्माती एकता कपूरने म्हटलंय. एकता कपूरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड असल्याचं एकता म्हणाली आहे.
लॉकअप शोची निर्माती एकता कपूरने म्हटलंय. एकता कपूरने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात हा कार्यक्रमाला 2.3 मिलियन लोक लाईव्ह पाहत असल्याचं दिसतंय. हे सगळं बघून तिला झालेला आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त केलाय. तिच्या या पोस्टवर अर्जुन बिजलानीने कमेंट केली आहे.” ही दोन महिलांच्या कामाची जादू आहे”, असं अर्जुन बिजलानी म्हणाला आहे. तर अनेक चाहत्यांनी कंगना आणि एकताचं अभिनंदन केलं आहे.
कंगना पहिल्यांदाच करतेय अँकरिंग
कंगना पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसतेय. तिची स्टाईलही वेगळी आहे. ती जर काही सूचना द्यायची असेल तर ती चुटकी आणि टाळ्यांच्या वापर करते. तिच्या या कामाचं अनेकजण कौतुक करत आहेत. कंगना तिच्या लॉकअपमध्ये ‘क्वीन’सारखी वावरते.
महत्वाच्या बातम्या :

