Share

“कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही”, दोन तासांच्या चौकशीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : मुंबईच्या सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा दोन तास जबाब नोंदवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला.

यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘मी गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले.’ तसेच कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या प्रकरणी मला मुंबई पोलिसांकडून प्रश्नावली पाठवण्यात आली होती. परंतु, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता.’ तसेच यापूर्वी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता आणि कोणतीच कारवाई केली नव्हती. मी हा घोटाळा काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता, असेही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!