Share

मोठी बातमी! नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेतली, राष्ट्रवादीचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(१७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असणाऱ्या सिव्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. तसेच हा कार्यभार आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,‘नवाब मलिक जोपर्यंत पुन्हा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत ज्या जिल्ह्याची त्यांच्याकडे जबाबदारी ते नसल्यामुळे काम थांबू नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था करायचे आम्ही ठरवले आहे.’ तसेच त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या इतरांना देण्याचे काम दोन-चार दिवसांत पूर्ण होईल, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष असून ते सध्या उपलब्ध नसल्याने त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक आम्ही करणार आहोत. तसेच पक्ष संघटनेची येणाऱ्या निवडणुका आणि अन्य सर्व गोष्टींची हाताळणी, आमचे हे कार्याध्यक्ष नवाब मलिक यांच्यासह करतील’, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!