Share

हृदयद्रावक : कोरोनाला हरवून आज मिळणार होता डिस्चार्ज अचानक आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं

Published On: 

विरार : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात तेरा रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यात पाच महिला तर आठ पुरुषांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.

विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज मध्यरात्री ३ ते ३.३० च्या दरम्यान भीषण आग लागली. यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास १७ रुग्ण उपचार घेत होते. यातील १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, यानंतर आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे.

या आगीत क्षमा अरुण म्हात्रे या महिलेचाही मृत्यू झाला. क्षमा म्हात्रे या रुग्णालयात कोरोनावर एक महिन्या पासून उपचार घेत होत्या. त्यामध्ये त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी होणार होती, मात्र आगी मुळे त्यांनी जगाचाच निरोप घेतला. यामुळे त्यांच्या दोन लहान मुली अनाथ झाल्या आहेत.

कळंब हे गाव वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे या पहिल्या रुग्ण ठरल्या होत्या. त्यांच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्या पासून उपचार सुरू होते. कोरोना मधून त्या बऱ्या ही झाल्या. आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार होती. परंतु दुर्देवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत होरपल्ल्याने त्यांनी ह्या जगाचाच निरोप घेतल्याचे समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!