जालना: कोरोना महामारीचा कहर वाढत असल्यामुळे संचारबंदी लावण्यात आली आहे, पण या संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब लोकांचे हाल होत आहेत. पहिल्या लाटेत हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक दात्यांनी हात पुढे केले होते. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळला होता. परंतु थैमान घालणारी कोरोनाची दुसरी लाट आणि लागू असलेली संचारबंदी यात हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र दातृत्वाचा झरा आटल्याचे चित्र दिसत आहे. गतवर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता.
त्यामुळे अनेकांची रोजीरोटी गेली होती. शिवाय मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे पोटाची भूक कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी मदतीसाठी अनेक दानशुरांचे हात पुढे आले होते. काहींनी जीवनावश्यक वस्तूच्या कीटचे वाटप केले. तर काहींनी कपडे, फळांचे वाटप केले. अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी व खासगी डॉक्टरांनी जीव धोक्यात घालून काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी उधळण्यात आली होती
दानशूरांनी मदतीचा हात आखडला असला तरी शासनाकडून सुरू असलेल्या शिवभोजन थाळीचा तालुक्यातील काही गरजूंना लाभ मिळत आहे. वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे अनेकांच्या हातचा गेलेला रोजगार ही स्थिती पाहता तालुक्यासह जिल्ह्यातील दानशुरांनी गरजू कुटुंबाला मदतीचा हात देण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त
- आखिर चल क्या रहा है महाराष्ट्र में? काँग्रेसच्या माजी खासदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर
- ‘सॉरी, कोरोना व्हॅक्सिन आहे हे माहित नव्हतं’; चोराने चिट्ठी लिहून ‘ती’ पिशवी केली परत

