Share

तेव्हाही सांगितलं होतं अन् आजही सांगतो मी शिवसेना सोडणार नाही – केसरकर

Published On: 

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे जेष्ठ नेते दीपक केसरकर नाराज असल्याच्या बातम्यांनंतर अखेर केसरकर यांनी पुढे येऊन आपण नाराज नसून शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. “कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (मनोहर पर्रिकर) यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे.

तर “मंत्रिपदाबाबत मी नाराज नाही, तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. सिंधुदुर्गाचं मंत्रिपद गेल्याचं शंभर टक्के दुःख आहे. वैभव नाईकांना मंत्रिपद दिलं असतं. मी त्यावेळी सांगितलं होतं, की मला मंत्रिपद दिल्यास तीन वर्षात चांदा ते बांदा विकास करुन मी राजीनामा दिला असता आणि वैभव नाईक यांना मंत्रिपद देण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली असती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याचं समाधान आहे.” असेही केसरकर म्हणाले.

दरम्यान, “मी कोकणातील दहशतवादाविरोधात लढणार असून तो केवढाही मोठा माणूस असो, मी त्या विरुद्ध उभा राहणार आहे. मी भाजपमध्ये जाणार, या केवळ अफवा होत्या. माझी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती. पण आपण कधीही शिवसेना सोडून जाणार नाही, हे त्यावेळीच स्पष्टपणे सांगितले होतं. आजही स्पष्ट करतो की मी कधीही शिवसेना सोडून जाणार नाही. मला त्यावेळी फक्त उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं. कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून फोन आला. यावेळी गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही” असा गौप्यस्फोटही दीपक केसरकर यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!