अमरावती : गुरूवार 8 सप्टेंबर रोजी अमरावतीमधील एक तरूणी बेपत्ता झाली होती. मुलगी सापडत नसल्याने तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती, सदर युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावतीमधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि याकरीता खासदार नवनीत राणा यांनीसुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता, त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.
काय म्हणाल्या वर्षा भोयर?
याच पार्श्वभूमीवर आता पोलीस कर्मचार्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय तसेच नवनीत राणांना आता सोडणार नसल्याचा ईशाराही दिला असल्याचं समजतं आहे.
नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जो काही राडा केला, तो माझ्या काळजाला लागला आहे. कोणीही याव आणि पोलिसांना मनात येईल ते बोलून मोकळं व्हावं. तुला लोकांप्रती एवढं प्रेम येतं ना, मग कालंच लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे का?.याच्याआधी कितीवेळा तरी अशी प्रकरणं झाली, त्यावेळी तू कुठं गेली होती?, असा सवाल वर्षा भोयर यांनी राणा यांना केला आहे.
…म्हणून तिला अमरावती मधून निवडूण दिलं होतं
मझ्या काळजाला हे सगळं लागलं कारण मी एक पोलीस पत्नी, मुलगी, सून, आई आणि पोलिसाची बहिण सुद्धा आहे. माझ्या घरातील तीन पिढ्या पोलिसांमध्ये आहे. आज कोण कुठंली ती नवणीत राणा स्वत:ला खासदार म्हणू लागली. तिला अमरावतीमधून खासदार म्हणून निवडून दिलं, तिला अमरावतीमधील लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी केंद्रामध्ये पावठलं होतं. नाकी स्वत:चा माज, मस्ती आणि तिचा इगो दाखवण्यासाठी अमरावतीमध्ये तिला निवडुण नव्हतं दिलं.
पुढे त्या असंही म्हणाल्या की, पक्षचा विचार गेला चुलीत. परंतू ती एक महिला आहे, महिला म्हणून ती कोणत्या महिलेच्या मागे उभी राहिली?, असा सवाल देखील वर्षा भोयर यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Congress vs Bjp | राहुल गांधींनी घातला 41 हजारांचा टी-शर्ट! भाजपच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर! म्हणाले, “मोदींचा सूट…”
- Mohit Kamboj |”गणेशोत्सव,दहीहंडीच्या शुभेच्छाही द्यायला विसरले”; भाजपच्या ‘या’ नेत्याचा ठाकरेंवर निशाणा
- Sunil Raut | संजय राऊतांच्या जामीनीसाठी भाऊ सुनील राऊत धावले! मातोश्रीवरुन थेट दिल्लीला
- Mohit Kamboj | याकूब कबरीप्रकरणावरून मोहित कंबोज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लबोल
- Devendra Fadnavis | “आमच्या सरकारमध्ये हिंमत होती…” ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला


