Share

Shinde vs Thackeray | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देणार होते मोठा झटका! शिवसेना खासदाराच्या मुलाने केले ऑपरेशन फेल

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्षात मोठा बंड करुन उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देणारे एकनाथ शिंदे अजूनही त्यांची पाठ सोडत नाही आहेत. संपूर्ण शिवसेना काबिज करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात सुरु असल्याचे दिसते. दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचे प्रयत्न राज्यात सरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याला मोठा धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जवळपास सर्व तयारी केली होती. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात सामील होणार होते. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे किर्तीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यानंतर ते उद्धव ठाकरे यांना सोडणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण, यामध्ये गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकरची एंट्री झाली आणि शिंदेंचे ऑपरेशन फेल झाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल कीर्तिकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली आहे. वडिलांच्या शिंदे गटात जाण्यास त्यांनी विरोध केला. मुलाने वडिलांना सांगितले की, “शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत आपण उद्धवसाहेबांना सोडले तर देवही मला माफ करणार नाही. जगात माझ्यासारखा स्वार्थी माणूस नसेल.” यानंतर कीर्तीकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय बदलला.

गजानन कीर्तिकर यांनी निर्णय बदलला-

दरम्यान, शिंदे गटाने गजानन कीर्तीकर यांना केंद्रात मंत्रिपद आणि त्यांच्या मुलाला विधानपरिषदेत संधी देऊ केल्याचेही समोर आले आहे. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे अमोल कीर्तिकर यांनीही शिंदे गटाला पाठिंबा देण्यास साफ नकार दिला. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांनीही आपला निर्णय बदलत उद्धव ठाकरेंची बाजू न सोडण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत गजानन कीर्तिकर?

गजानन कीर्तिकर शिवसेनेचे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 1990 ते 2009 दरम्यान ते चार वेळा आमदार होते. कीर्तिकर हे मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. शिवसेना-भाजप युती काळात ते सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1,83,000 मतांच्या फरकाने पराभव केला. गजानन कीर्तिकर सलग दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!