Share

Shivsena | शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती, मतभेद झाले तर काय?, पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितला उपाय

Published On: 

मुंबई : काल शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड पक्ष एकत्र येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी हालचाल होणार असल्याचं दिसून येतं आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपली मतं मांडायला सुरूवात केली आहे. अशातच यावर मराठा समाजाचे नेते पुरुषोत्तम खेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे.

दोन्ही पक्षांना राजकीय-

शिवसेना पक्षाला आता कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. परंतू जरी हे खरं असले तरी दोन्ही पक्षांना राजकीय गरज असल्याने ही युती झाली असल्यामुळे मी या युतीचे स्वागत करत असल्याचं पुरुषोत्तम खेडकर यांनी सांगितलं आहे.

पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला सल्ला-

या अनपेक्षित पक्षांच्या युतीवर पुरुषोत्तम खेडकर एक सल्लाही दिला आहे. या दोन्ही पक्षांमध्ये भविष्यात काही मतभेद झाले तरी ते त्यावर वेळेनुसार आणि परस्थिती नुसार योग्य ते बदल करावे लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या युतीच्या निर्णयामुळे मराठा मते एकाच ठिकाणी राहण्यासही मदत होणार आहे. तरीही दोन्ही गटाने किमान समान कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. यासाठी संभाजी ब्रिगेड महत्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद खेडकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सेना पुन्हा उभारी घेईल-

तसेच, शिवसेना पक्ष हा प्रबोधनकारांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. सेनेचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाहीय हे आधीच बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात सेना पुन्हा उभारी घेईल, असंही खेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!