🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून, राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. अशातच काल स्व. आनंद दिघे यांची पुण्यतिथी होती. त्यावेळी हे दोन्ही गट आमने-सामने आले होते. त्याठिकाणी त्यांनी एकमेकांवर टीका केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच आनंद दिघे यांचा वारसा कोण चालवणार याविषयी खूप वेळा बोललं जातं. अशातच यामुद्यावरून शिवसेना पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेणार?
आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेतो हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल, असं म्हणत राजन विचारे यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
आनंद दिघे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम-
स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खारकर आळीतील शक्तिस्थळावर दिघे यांना अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी बोलताना राजन विचारे यांनी शिंदे गटाला फटकारलं. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि महिला आघाडीच्या अनिता बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या देखील उपस्थित होत्या.
राजन विचारे म्हणाले आमचा आनंद हरपला-
दरम्यान, राजन विचारे यांनी व्हिडिओ क्लिपच्यामाध्यमातून एक संदेश दिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात ते झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरे, ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | राज्यातील नवे सरकार काहींना हजम होत नाहीय- एकनाथ शिंदे
- Gulam Nabi Azad | काँग्रेस पक्ष सोडताच गुलाम नबी आझाद यांनी पुढील राजकीय वाटचालीची केली ‘ही’ मोठी घोषणा
- Shivsena । निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा; मुदतवाढीची मागणी केली मान्य
- राजभवनाचा इतिहास पुढे आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत; राज्यपाल कोश्यारी यांचे जॅकी श्रॉफ यांना आवाहन
- Nilesh Rane | शाहरुख खान एवढी क्रेझ शहाजीबापू पाटलांची महाराष्ट्रात झाली – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
