मुंबई : मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेते आणि विरोधी पक्षांचे नेते आमने-सामने आल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता सोशल मीडियावर शिवसेनेच्या एका जुन्या पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेनेच्या फेसबूक पेजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे एक वक्तव्य आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) हे जरी मित्र असले तरी ती नीच प्रवृत्ती आहे, असे म्हणत टीका केली आहे. ही पोस्ट २०१२ ची असून पुन्हा एकदा या पोस्टमुळे शिवसेना-राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी होताना दिसत आहे. राज्यात कधीकाळी कट्टर विरोधक असणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस यांचे सरकार आहे. शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका बदल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.
दरम्यान, इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा ही पोस्ट चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या व्हायरल पोस्टवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “त्यांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
- “…याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही”, अविनाश जाधवांचा हल्लाबोल
- “अशा नतद्रष्टांच्या छाताडावर पाय ठेवून…”; संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- “लाव रे तो व्हिडीओ आणि आता …”, जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती


