Share

उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर फडणवीस काय करणार ?, राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई : कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

या बैठकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर उद्रेक होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आम्ही लोकांना समजवू, सत्ताधारी मंत्रींना सांगा, रोज केंद्राकडे बोट दाखवत असतील तर मग आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा कसे करता. सत्ताधारी मंत्र्यांना समज देण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. सत्ता पक्षतील मंत्र्यांनीही राजकारण करू नये नाही तर त्यांच्ये इंटरव्ह्यू पाहिले तर आम्हाला त्याला उत्तर द्यावे लागते. मुख्यमंत्री आपण सत्ता पक्षतील मंत्र्यांना समज दिली पाहिजे असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

फडणवीसांच्या या भूमिकेचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस यांचा असलेला विरोध हा भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. मात्र, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार ? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!