जालना: शहरात मागील काही दिवसात चोरीच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. वाढत्या घटना प्रशासनसाठी चिंतेचा विषय ठरत, शहरातील समर्थ अपार्टमेंटरच्या पार्किंगचे गेट तोडून २२ लाख रुपयांचे कांदा बियाणे व एक वाहन चोरून नेणाऱ्या एकाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत मुसक्या आवळल्या. संशयितांकडून चोरीस गेलेल्या बियाण्यासह वाहन असा एकूण २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुना जालन्यातील घोगरे स्टेडीयमजवळील समर्थ अपार्टमेंटच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका छोटा हत्ती वाहनासह २२ लाख रुपयांचे कांदा बियाणे लंपास केले होते. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू होता. दरम्यान, सदर चोरी पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार संशयित सागरसिंग फंट्यासिंग उर्फ सुरजसिंग अंधरिले याने त्याच्या इतर साथीदारासह केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित सागरसिंग यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने समर्थ अपार्टमेंटमधील कांदा बियाणे चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले २२ लाख रुपये की मतीचे कांदा बियाणे व एक छोटा हत्ती वाहन, असा एकूण २३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
महत्वाच्या बातम्या
- पराभवाचे धोनीने सांगितले कारण, म्हणाला…
- महत्वाची बातमी : रेमडेसिवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
- उस्मानाबाद जिल्हा घरफोडी; ५० हजारांच्या रोकड सहित चोरट्याने सिलिंग फॅन ही केला लंपास
- मोठी बातमी : शिवसेनेच्या रणरागिणीचे कोरोनामुळे निधन…
- पत्रकार दातीर हत्या प्रकरणाला धक्कदायक वळण, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्यावर आरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

