मुंबई : आयपीएलच्या नव्या मोसमात एमएस धोनीची चेन्नई सुपरकिंग्स मागच्यावर्षाची कामगिरी विसरून पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे, पण पहिल्याच सामन्यात धोनीच्या पदरी निराशा आली आहे.शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली. यानंतर धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी चेन्नईकडून रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या.
आयपीएलमध्ये दिल्लीविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ सलग तीन वेळा दिल्लीकडून पराभूत झाला आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला धोनी शून्य रनवर आऊट झाला. आवेश खानने धोनीला दुसऱ्याच बॉलवर आऊट केलं. आयपीएल इतिहासामध्ये धोनी पाचव्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पराभवाचे धोनीने सांगितले कारण, म्हणाला…
- महत्वाची बातमी : रेमडेसिवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
- उस्मानाबाद जिल्हा घरफोडी; ५० हजारांच्या रोकड सहित चोरट्याने सिलिंग फॅन ही केला लंपास
- मोठी बातमी : शिवसेनेच्या रणरागिणीचे कोरोनामुळे निधन…
- पत्रकार दातीर हत्या प्रकरणाला धक्कदायक वळण, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्यावर आरोप !


