मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या पत्राचा भाजप नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. महिला अत्याचाराच्या प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्रालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रत जाळतं जाहीर निषेध केला. आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांच्या या कृत्यावर खडेबोल सुनावले आहेत.
‘मुख्यमंत्र्यांचे सविस्तर आणि संवेदनशील पत्र जळणाऱ्यांची कीव येते. महापालिका निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे केवळ राजकीय हेतूने असे कृत्य केले जातायत. गुजरातमध्ये ९ हजार कोटींचे ड्रग्ज सापडतात, त्यावर कोणी बोलत नाही. कारण ते गुजरातमध्ये आहे. हेच चुकून महाराष्ट्रात झालं असतं तर टीकेची झोड उठवली असती,’ असं म्हणत अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- राज्यपालांनी विरोधकांचे थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देतात; राऊतांचा हल्लाबोल
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव


