मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका अत्याचार प्रकरणावरून कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष वेधले. तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली आहे. महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये होणाऱ्या वाढीवरून देखील राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी विविध राज्यांचे दाखले देत देशातूल महिला अत्याचारांचा लेखाजोखाच मांडला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार व हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर त्या पातळीवरच चर्चा व्हायला हवी. यासोबतच, राज्यपालांची भूमिका ही सरकारविरोधी लोकांशी सुसंगत असून हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
आज दिवसभर भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रावरून खडाजंगी सुरु आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील आता राज्यपालांच्या पत्रावर खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे, पण ते उत्तेजन देत आहेत, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
‘अशा प्रकारचं पत्र लिहून ते मीडियाकडे लीक करण्याची गरज नाही. विशेष अधिवेशन कशासाठी? असं काय घडलं आहे महाराष्ट्रात? राज्यापाल हे राज्याचे पालक आहेत. त्यांनी राज्याची बदनामी करु नये. घटनात्मक पदावर ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते या राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. राज्याची बदनामी होत असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे.’ असा सल्ला राऊत यांनी राज्यपालांना दिला आहे.
पुढे त्यांनी भाजपवर आगपाखड केली. ‘भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारांनी काँग्रेसला सोडले नाही, तर त्यांना बाहेर काढण्यात आले’, आठवलेंनी केला खुलासा
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

