मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी जामीन अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आज पत्रकारांशी बोलले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘आतापर्यंत राज्यसरकारने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन स्वतः सरेंडर होण्यासाठी कोर्टात जात आहे.’ त्यानंतर ते सिंधुदुर्गच्या कणकवलीच्या दिवाणी न्यायलयात सरेंडर झाले होते. आता त्यांना चार फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. या प्रकरणी शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर 'बोक्या' शरण आला. आता दोन दिवस बस पोलीस कोठडीत. न्यायापुढे सगळे समान असतात!#NiteshRane @ShivSena @ShivsenaComms #Mumbai #Maharashtra @AUThackeray @the_yuvasena @yuvatiyuvasena pic.twitter.com/cVtVOIVijL
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) February 2, 2022
मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राणेंवर टीका केली आहे. कायंदे म्हणाल्या, संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सर्व प्रयत्न करून झाले आणि या पूर्वीच त्यांनी कायद्याचं पालन केलं असतं, कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर त्यांची प्रतिमा थोडी तरी टिकून राहिली असती. मात्र आज त्यांची सर्व प्रतिमा लयास गेली आहे. कायद्यापुढे कोणाच काही चालत नाही आणि कायदा सर्वांसाठी समान असतो निदान हा बोध राणे यांनी आत्ता तरी घ्यायला पाहिजे, अशा शब्दात कायंदे यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘मोदींनी दोन भारत तयार केले एक श्रीमंतांचा आणि दूसरा…’; राहुल गांधींची टीका
पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा ??
“इंदापुरात दडपशाही…”; अंकिता पाटील-ठाकरेंचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर हल्ला
“माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा…”; करिना कपूरने उलगडले गुपित
दुकानदाराकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी भाजप नगरसेवकासह चौघांना अटक


