🕒 1 min read
पुणे: पुणे- मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग येत्या काही दिवसातच जाहीर करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात पुणे महानगरपालिकेसाठी नवीन प्रभाग रचना आणि त्या नवीन प्रभागांचे नकाशे अनुक्रमे जाहीर करण्यात आले. पुणे महानगरपालिकेत २०१७ च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी पक्ष या दोन पक्षातच आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीची लढत असणार आहे. भारतीय जनता पक्षाने जशी कंबर कसली आहे, तशीच जोरदार तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पण सुरु केली आहे.
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी आहे. परंतु प्रभागांचा प्रारूप आराखडा जाहीर होताच स्वबळाचा नारा दिला आहे. पुणे महानगरपालिकेतील नवीन प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल झाली आहे, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी आम्ही स्वबळावर लढू अशी जाहीर घोषणा करून टाकली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेली स्वबळाची भाषा ही जागा वाटपात मित्रपक्षांवर दबाव टाकण्यासाठी असल्याचीही चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
पुणेमहापालिका निवडणुकीसाठीची प्रभागांची प्रारूप रचना मंगळवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करतानाच त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी शरद पवार आणि अजित पवार घेतील असे देखील स्पष्ट केले. पुण्यातील नवीन प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल झाली आहे. त्यामुळे या विषयी बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकित पक्षाचे १२२ नगरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास दाखवला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ८ विधानसभा मतदार संघ आहेत , त्यापैकी खडकवासला, हडपसर आणि वडगावशेरी या तीन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व राहील असाही आत्मविश्वास शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दाखवला.
महत्वाच्या बातम्या :
- “इंदापुरात दडपशाही…”; अंकिता पाटील-ठाकरेंचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर हल्ला
- दुकानदाराकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी भाजप नगरसेवकासह चौघांना अटक
- U19WC: भारतीय संघाचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमीफायनल सामना
- नुसरत जहाँने यश दासगुप्तासोबतच्या दुसऱ्या लग्नाचे सांगितले सत्य, वाचा अधिक
- २ कोटी रोजगारांच्या घोषणेवरून राज्यसभेत भाजपला घेरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
