मुंबई: बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्रींपैकी करिना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) हे बॉलिवूडमधलं सर्वपरिचित नाव आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठी चर्चा देखील पहायल मिळतं. मात्र तिच्याबद्दल होणाऱ्या चर्चेंवर काय वाटतं हे नुकतच तिने खुलासा केला आहे.
दरम्यान करिना कपूरचं काम, तिचं वैयक्तिक आयुष्य, तिचं ब्रेकअप, तिचं सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) लग्न, तिचा मुलगा तैमूर (Taimur) याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. मात्र करिनाने याबद्दल एका मुलाखतीत उलगडा केला. यापूर्वी तिच्याबद्दल सोशल मीडियावरील गॉसीप आणि ब्रेकअप या सर्व गोष्टींचा त्रास व्हायचा, वाईट देखील वाटायचं असं तिनं नुकतच अभिनेत्री ट्विंकल खन्ना (actress Twinkle Khanna) हिने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.
तसेच पुढे म्हणाली ‘माझं वैयक्तिक आयुष्य, माझं करिअर या सगळ्या गोष्टींवर लोक विनाकारण चर्चा करतात. आधी मला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा. मात्र आता मी या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. माझं करिअर, मी नाकारलेला सिनेमा याबाबतही बोललं गेलं. एकेकाळी माझं ब्रेकअप हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय होता.
त्यानंतर मी सैफसोबत लग्न केलं. आमचं लग्नही टीव्ही चॅनेलच्या हेडलाईनमध्ये होतं.’ या उलगडा केला. विशेष म्हणजे करिना म्हणाली, ‘मी संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट नाकारला तर ही गोष्ट एक वर्षभर चर्चेचा विषय ठरला.’ करीना कपूरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा सिनेमा १४ एप्रिलला प्रदर्शित होणार असून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या:
पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच ; हिंदू व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या
‘अर्थसंकल्पाचा संदेश गावोगावी पोहोचवणार’; चंद्रकांत पाटलांचे विधान


