🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, मोदी सरकारने उद्योग क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण केली आहे. कोरोना काळात जसं कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आले तसा दोन उद्योगपतींचा व्हेरियंट आला आहे आणि त्यांच्या हातात देशातील सर्व उद्योग देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एका व्यक्तीकडे खनिजं, तेल, वीज असं जे काही आहे नाही ते दिलं तर दुसऱ्या व्यक्तीकडे पेट्रोकेमिकल, ई-कॉमर्स, टेलिकॉम असे उद्योग दुसऱ्याकडे देण्यात आले. हे दोन उद्योगपती म्हणजे अदानी आणि अंबानी आहेत.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. एक भारत असा आहे जो खूप श्रीमंत आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांना पाणी, वीज यासारख्या समस्या भासत नाहीत. दुसरा भारत गरीब पिचलेल्या लोकांचा आहे. या दोन भारतामधील दरी वाढत आहे. रेल्वेच्या नोकरीसाठी बिहारमध्ये युवकांनी आंदोलन केलं. भारतातील युवक हे सरकारकडून रोजगार मागत आहेत पण सरकार त्यांना ते देण्यास सक्षम नाही. पण केंद्र सरकारने बेरोजगारांच्या मुद्द्यावर एकही शब्द काढला नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“इंदापुरात दडपशाही…”; अंकिता पाटील-ठाकरेंचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंवर हल्ला
-
“माझ्या अफेअरची चर्चा व्हायची तेव्हा…”; करिना कपूरने उलगडले गुपित
-
दुकानदाराकडून खंडणी मागीतल्या प्रकरणी भाजप नगरसेवकासह चौघांना अटक
-
टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य सामन्यात झेल सोडल्याचे अजूनही दुःख, हसन अली
-
“काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं”; राज ठाकरे निवडणुकीसाठी सज्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
