🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, या मुद्यावरून आता राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार करायला हवा. तसेच हिंदुत्वाकरीता नेहमीच लढण्याची गरज नाही. राजकीय पक्ष म्हणून जी वचन देतो ती पूर्ण करणेही हिंदुत्व आहे, असेही आदित्य म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘ते नेहमीच टाईमपास करायचे म्हणून मी मनसेला टाइमपास टोळी म्हणायचो. परंतु, आता मला चांगलं वाटतंय की भाजपची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळाले आहे.’ तसेच भाजपची बी टीम एमआयएम असून सी टीम मनसे आहे, असा खोचक टोलाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- मनसे नेत्याने ‘अजान’च्या निषेधार्थ लाऊडस्पीकरवर वाजवली ‘हनुमान चालिसा’, मुंबई पोलिसांनी ठोठावला दंड
- “समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां” – चित्रा वाघ संतापल्या
- नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान
- “राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते” – गुलाबराव पाटील आक्रमक
- “राज ठाकरे कधी आयुष्यात जय भीम म्हणाले का?” – आव्हाडांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
