Share

Omraje Nimbalkar । शिंदे गटाकडून ओमराजेंना ‘ही’ ऑफर; पण ओमराजे म्हणतात…

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठा सत्ताबदल झाला. शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. पुढे ४० आमदार आमच्या सोबत आहेत. म्हणून आमची शिवसेना हि खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गट करू लागलं आहे. तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून दररोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे.

यावेळी ओमराजे निंबाळकर म्हणाले कि, आम्हाला देखील खोका, पेटी, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पदाची ऑफर होती. मात्र आम्ही शिवसेनेबरोबर प्रतारणा केली नाही. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. सध्या अनेक नेते शिवसेनेतून शिंदे गटात दाखल होत आहेत. या नेत्यांना शिंदे गटातून ऑफर मिळत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दोन्ही गट मूळ शिवसेनेचेच असल्याचा दावा करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!