मुंबई : मध्यप्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय भुकंपानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधरी पक्षावर हल्लाबोल केला आहे. तर कॉंग्रेसमधून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचे तोंडभर कौतुकही केले आहे. आता भाजपमध्ये महाराज आणि शिवराज एक आहेत, असे भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने `हमारा नेता शिवराज, माफ करो महाराज’ असे घोषवाक्य तयार केले होते. याबाबत आज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर शिवराजसिंह चौहान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच स्वागत है महाराज, साथ है शिवराज’ असे म्हणत त्यांचे भाजपात स्वागतही केले आहे.
शिवराज चौहान म्हणाले, की कॉंग्रेसमध्ये महाराज म्हणजेच ज्योतिरादित्य शिंदे हेच प्रसिद्ध होते. त्यामुळे आम्ही आमचे घोषवाक्य हमारा नेता शिवराज, माफ करो महाराज असे केले होते. आता भाजपमध्ये महाराज आणि शिवराज एकच झाले आहेत. जेव्हा सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा भाजप आणि माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप आनंदाचा दिवस आहे. आज मला राजमाता शिंदे यांची आठवण येते. ज्योतिरादित्य आता भाजप कुटुंबातील सदस्य बनले आहेत. त्याच्यासाठी राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे एक साधन आहे. हा माझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
