🕒 1 min read
अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. दिपाली चव्हाण यांना न्याय मिळावा यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत.
सुसाईड नोटमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. दीपाली चव्हाणने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करणे हा खून नव्हे, तर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि मेळघाटचे माजी क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी या दोघांच्या मस्तवालपणातून घडलेला खूनच आहे असा आरोप ‘जस्टिस फॉर दीपाली’च्या मंचावरून माहेर संस्थेच्या अध्यक्ष अरुणा सबाने आणि अ.भा. सत्यशोधक महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या अध्यक्ष वंदना वनकर यांनीकेला आहे.
भविष्यात अशी एकही दीपाली बळी पडू नये, यासाठी या दोघांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करताना त्यांनी दीपालीसोबत घडलेल्या सर्व अन्यायाचा पाढा वाचला आहे.शिवकुमारमुळे दीपाली प्रचंड दहशतीत होती. त्याच्या गाडीचा हॉर्न ऐकला तरी आपला बीपी वाढतो, असे ती सांगायची. रात्री-अपरात्री भेटायला बोलावणे, थोडा उशीर झाला तरी ‘साली’ अशी शिवीगाळ करणे, रात्री १२-१ वाजता संकुलावर भेटायला बोलावणे, असे प्रकार तो करायचा असे त्यांनी म्हटले आहे.
तो दररोज दीपालीच्या कार्यालयात येऊन तिच्या खुर्चीवर बसायचा. सर्व कनिष्ठ सहकाऱ्यांसमोर घाणेरड्या शिव्या द्यायचा. शिवकुमार गेल्यावर त्या रडायच्या. आत्महत्येच्या आदल्या दिवशीही तो कार्यालयात येऊन बरेच काही अपमानजनक बोलून गेल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती सबाने यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- नटराजन, शार्दूल नंतर आता मोहम्मद सिराजला मिळली एसयूव्ही थार
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या,मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
