Share

दादा म्हणतात… ‘एक दोन नव्हे तर सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच’

Published On: 

नागपूर :- आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. एकाबाजूला भाजप राज्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला नेते मात्र सेनेसोबत युती होणारच हे ठणकावून सांगत आहेत.

पाटील म्हणाले,दोन्ही पक्ष एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे आहेत. विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल. मात्र सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान,ज्यात भाजप संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रात भाजप संघटनेतील सदस्य संख्या ही १ कोटी ६ लाख होती. याच महिन्यात ती ५० लाखाने वाढवणार आहे. आतापर्यंत ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ धरुन ही संख्या सध्या ३२ लाख झाली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!