टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत सातारा मतदार संघाकडे सगळ्या राज्याच्या नजरा टिकून आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनोमिलन झाल्याने या निवडणुकीत खरी रंगत आली होती. मात्र, लोकसभेला पक्षाने खा. उदयनराजेंना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांचे आदेश मानून आम्ही लोकसभा निवडणुकीत व्यासपिठावर जावून उमेदवारांच्या प्रचाराचे काम केले आहे. त्यामुळे पालिकेत मनोमिलन झाले असा अर्थ कोणी काढू नये. अस सूचक विधान करत दोन्ही राजेंमध्ये अजून सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट केल आहे.
दरम्यान, साताऱ्यात स्व. श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या 75 व्या जयंती निमित्त सातारा महोत्वस 2019 चे आयोजन 5 ते 6 मे असे करण्यात आले आहे. त्या संदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. लोकसभेच्या झालेल्या मतदानानंतर प्रथमच शिवेंद्रसिंहराजे हे पत्रकार परीषदेला सामोरे गेले.
तर, सातारा-जावली या मतदारसंघातून खा. उदयनराजेंना किती मताधिक्य मिळेल, अस शिवेंद्रराजेंना विचारले असता त्यांनी मी आजपर्यंत विधानसभा निवडणुका लढविल्या पण कधीही मताधिक्याचा विचार केला गेला नाही. मग आता का करू ? अस उत्तर दिल आहे. त्यामुळे साताऱ्यातील उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील द्वंद्व अजून देखील संपलं नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

