टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी बुधवारी कमळ हाती घेतले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निष्ठेच्या मुद्द्यावर शिवेंद्रराजेंवर शाब्दिक निशाणा साधला आहे. आव्हाड म्हणाले, ‘शिवेंद्रराजे ज्या राजेंचा वारसा सांगतात त्या शिवाजीराजेंनी केवळ 16 मावळ्यांना घेऊन तोरणा जिंकला होता’ असे म्हणत शिवेंद्रराजेंवर चांगलाच निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना, शिवेंद्रराजे हे शिवरायांचे वारसदार नसून राजेंचे खरेच वारसदार आम्ही आहोत, असे आव्हाड म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आव्हाडांच्या या टीकेवर शिवेंद्रराजें भोसले यांनी चांगलेचं प्रत्युत्तर दिले आहे. शिवेंद्रराजें म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणीही मला माझा वारसा सांगू नये. मला माझा वारसा पूर्ण माहीत आहे,’ असे म्हणत शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. मोठ्या प्रमाणात आघाडीतील नेते सत्ताधारी पक्ष्यात पक्षांतर करत आहेत. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आघाडी खिळखिळीत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
पक्षांतराच्या मुद्यावरून संजय राऊतांनी केली टोलेबाजी
न्यायालय मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय देईल अशी खात्री – उदयनराजे भोसले
सुजय विखेंनी साकळाई पाणी योजनेचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला अन् फसवणूक केली
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या तिवरे धरणाच्या दुर्घटनेचाही तावडेंनी ‘विनोद’ केला – जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

