Share

शिवेंद्रराजेंच्या आंदोलनाचा दणका; महामार्ग दुरुस्तीचे काम सुरु

Published On: 

🕒 1 min read

सातारा : महामार्गाची दुरावस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वाणवा यामुळे टोल का भरायचा ? टोल बंद करावा, यासाठी आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी टोलबंद आंदोलन करण्यात आले होते. टोल वसुली बंद झाल्याने रिलायन्स इन्फरच्या अधिकार्यांची भंबेरी उडाली. त्यांनी हात जोडून शिवेंद्रसिंहराजे यांना त्वरीत महामार्ग दुरस्तीचे काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या धडक आंदोलनाच्या दणक्यामुळे सातारा नजीक महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरुस्ती युध्दपातळीवर सुरु झाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पुणे राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. अशी मागणी करत शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावरच न थांबता त्यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून महामार्ग दुरुस्ती आणि आवश्यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबत सकारात्मक चर्चा करुन तसे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांना देण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हाधिकार्यांनी संबंधीत सर्व अधिकार्यांची बैठक बोलावून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. मात्र तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यावर काहीही फरक पडला नाही. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा टोलबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास शिवेंद्रसिंहराजे कार्यकर्त्यांसमवेत आनेवाडी टोलनाक्यावर धडकले आणि जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनकांनी दोन्ही बाजूची टोल वसुली बंद करुन ठेकेदारस मोठा धक्का दिला. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्तीने आंदोलन लवकर थांबेल असे वाटत असतानाच आ. शिवेंद्रसिंहराजे आणि आंदोलकांनी दुपारी ३.३० पर्यंत ठिय्या मारला. त्यामुळे सुमारे तीन ते चार तास टोल वसुली बंद होती. याचा मोठा धसका रिलायन्सच्या अधिकार्यांनी घेतला. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर हात जोडून महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरुस्ती लगेच सुरु करत असल्याचे आणि इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. यामध्ये त्यांनी जाहिर माफीही मागितली. यानंतर मागून घेतलेल्या मुदतीत सर्व कामे पुर्ण न झाल्यास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलनाका ठेवायचा का नाही? हे ठरवा, असा इशाराही दिला.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या आक्रमक आंदोलनामुळे रिलायन्सच्या ठेकेदारांची बोबडीच वळली. के रसायन काही औरच असल्याची प्रचिती आल्याने लागलीच त्यांनी महामार्गा आणि सेवा रस्त्यांची दुुरस्ती सुरु केली. ठिकठिकाणी खडी, डांबर टाकून आणि रोलींग करुन खड्डे बुजवण्याचे काम महामार्गवर सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या आंदोलनामुळे खड्डे भरण्याचे काम सुरु झाले असून याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1207994317073043457?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1207992340947714048?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!