जालना: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने संचारबंदी निर्णय जाहीर केला. विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात गरजू व गरिबांना पोटभर जेवण मिळावे याकरिता शिवभोजन थाळी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात पंधरा शिवभोजन केंद्रावर गरजूंना मोफत पार्सल स्वरुपात पोटभर जेवण मिळणार आहे.
कोरोना काळात गतवर्षी पहिला लॉकडाऊन लागल्यानंतर कामगार, भिकारी, गरिबांची मोठी उपासमार झाली होती. या काळात गरजूंना केवळ पाच रुपयात पोटभर जेवण करता यावे याकरिता जिल्ह्यात पंधरा ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आली. चार ते पाच महिन्यांच्या लॉकडाऊन काळात हजारो गरिबांना शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून दोन वेळेचे पोटभर जेवण मिळाले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने दि. १५ एप्रिल २०२१ पासून १ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.
यामध्ये जालना शहरातील गांधीचमन येथील श्री भोजनालाय महिला रुग्णालय, बसस्थानकाजवळील महाराजा हॉटेल, साई भोजनालय नवीन मोंढा, जिल्हा रुग्णालय, पुदीना रेस्टारंट रेल्वेस्थाक परिसर, लालभरी भेल सेंटर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्री संत गजानन महाराज उपगृह भोकरदन, मार्डन भोजनालय जाफ्राबाद, प्रेरणा बचत गट घनसावंगी, जय मल्हाट टी हॉऊस बदनापूर, हॉटेल लक्ष्मी अंबड, संकेत हॉटेल बदनापूर, सुरुची भोजनालय मंठा व प्रगती बचत गट घनसावंगी येथील शिवभोजन केंद्र सुरू राहणार आहेत.
- नागरिकांशी संवेदनशीलपणे वागा; गृहमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना
- कोहली-रोहितच्या पगारामध्ये वाढ नाही मात्र, हार्दिक पांड्याचे प्रमोशन
- भाजपचा आमदार फुटून पोटनिवडणूक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये; जयंत पाटलांच सूचक विधान
- ‘घराघरात भांडणं लावून घरं फोडली त्या शरद पवारांच्या घरातच आता टोकाची भांडणं सुरू आहेत’
- बारा बलुतेदारांना स्वतंत्र पॅकेज देऊन मदत करा; वडेट्टीवारांच मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

