Share

Udhdav Thackeray : “…हे मान्य केल्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देईन”, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच पेटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मनसेकडून राज्यपालांवर सडकून टीका केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट मराठी माणसांना डिवचू नका असाच इशारा दिला आहे. गुजराती आणि राजस्थानी लोक जर मुंबईतून गेले तर येथे पैसेच राहणार नाहीत, मुंबईची आर्थिक राजधानी ही ओळखही राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले होते. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यांना मुंबईच वैभव गिळायचं आहे, हे मान्य केल्याबद्दल मी राज्यपालांचे धन्यवाद देईन, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

राज्यपालांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच मनसे कडून जोरदार विरोध केला जात आहे. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाहीत असेच म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यपालांचे वक्तव्य हे अतिशयोक्ती अलंकार असल्याचेही म्हटले आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्यपालांच्या या वक्तव्याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत जरी बसले असले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, कारण त्यांना मुंबईतील पैसा हवा आहे. राज्यपालांनी अनावधानाने का होईना मुंबई बद्दलचा हेतू स्पष्ट केला. त्यांना मुंबईचे वैभव व पैसा गिळायचं आहे. हे मान्य केल्याबद्दल मी राज्यपालांचे धन्यवाद देईन. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे गट व भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली. मात्र आता या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय प्रतिक्रिया असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!